व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी (अक्रम शेख)
किल्ले बांधणी करताना यासाठी लागणारे कौशल्य अंगीभूत असते.यासाठीच विशेष अभ्यास करून हा छंद जोपासणाऱ्या ही पिढी कौतुक आहे,
विठ्ठलवाडी आकुर्डी परिसरामध्ये मुलांच्या कलेला वाव मिळावा म्हणून दरवर्षीप्रमाणे मनसे किल्ला स्पर्धा घेण्यात आल्या मुलांच्या किल्ल्यांवर भेट देऊन 55 किल्ल्यांना भेट दिली .त्यातील प्रथम क्रमांक राज सूर्यवंशी सिंधुदुर्ग किल्ला ,दुसरा क्रमांक शार्दुल परदेशी, तिसरा क्रमांक आयुष ठाकूर राजगड किल्ला, चौथा क्रमांक यशराज पवार रायगड किल्ला 55 स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या मुलांना सेलिब्रेशन चॉकलेट देण्यात आले.
मुलांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला योगिता कांबळे यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन केके कांबळे ,आशिष चव्हाण, विश्वनाथ काटे ,सचिन गुरव यांनी केले.
मनसेतर्फे आयोजित प्रभाग अंतर्गत २१ प्रभागांमध्ये झालेल्या किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरणप्रसंगी समाजिक कार्यकर्ता आक्रम शेख प्रमुख उपस्थित होते.
Discussion about this post