व्हीएसआरएस मराठी न्युज -मागील ३ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांमध्ये मोठे नैराश्य आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील नागरीकांना दररोज पाणीपुरवठा करावा. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल.
पिंपरी-चिंचवडकरांना फसवू नका, दररोज पाणी द्या, पाणीपुरवठा सुरळीत करा, नागरिकांना पुरेसे पाणी द्या, प्रशासनाचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा जोरदार घोषणा देत पाणीपुरवठा दररोज करण्याच्या मागणीसाठी मनसेने आज महापालिका मुख्यालयात आंदोलन केले.
मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात बाळा दानवले, रुपेश पटेकर, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी, अंकुश तापकीर, विशाल मानकरी, राजू साळवे, सुशांत साळवी, सुरेश सकट, नितीन चव्हाण, शिवकुमार लोखंडे, जितेंद्र वाल्हेकर, आकाश पांचाळ, गणेश भोंडवे, अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, श्रद्धा देशमुख, अनिता पाटील सहभागी झाले होते.
Discussion about this post