Mumbai News : मुंबई : काँग्रेसने राज्यसभेच्या उमेदवारीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून अखिलेशप्रसाद सिंग, हिमाचलमधून अभिषेक मनू सिंघवी, महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसे प्रसिद्धीपत्रक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ अन्य काही नेतेही त्यांच्या मागोमाग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे काँग्रेस आता डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
Discussion about this post