Mumbai News : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून महाविकास आघाडी आणि महायुती यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महायुतीच्या गोटात अद्याप शांतता दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ठरल्यावर महायुती आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. आघाडीच्या बैठका सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांना आघाडी लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. आघाडीने मुंबई उत्तर मध्य, उत्तर आणि लातूर या जागांवर अद्याप उमेदवार ठरलेले नाहीत.
मात्र, ४८ जागांवर संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आलेली नावे अशी आहेत. यापैकी काही जागांवर एकापेक्षा अधिक नावे चर्चेत आहेत.
कल्याण – सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरे (ठाकरे गट)
ठाणे – राजन विचारे (ठाकरे गट)
मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई (ठाकरे गट)
अकोला – प्रकाश आंबडेकर (वंचित बहुजन आघाडी)
शिरूर – अमोल कोल्हे (शरद पवार गट)
बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार गट)
जळगाव – हर्षल माने (ठाकरे गट)
रायगड – अनंत गीते (ठाकरे गट)
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत (ठाकरे गट)
मावळ – संजोग वाघेरे (ठाकरे गट)
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (ठाकरे गट)
मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील (ठाकरे गट)
रामटेक – रश्मी बर्वे, कुणाल राऊत, किशोर गजभिये, तक्षशिला वागधरे (काँग्रेस)
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)
संभाजीनगर – चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)
नाशिक – विजय करंजकर (ठाकरे गट)
अहमदनगर – निलेश लंके (शरद पवार गट)
अमरावती – बळवंत वानखेडे आणि राहुल गडपाले (काँग्रेस)
भंडारा – नाना पटोले (काँग्रेस)
पालघर – भारती कामडी (ठाकरे गट)
धाराशिव – ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट)
यवतमाळ वाशीम – संजय देशमुख (ठाकरे गट)
हिंगोली – सचिन नाईक (काँग्रेस)
परभणी – संजय जाधव (ठाकरे गट)
जालना – शिवाजीराव चोथे (ठाकरे गट)
पुणे – रविंद्र धनगेकर (काँग्रेस)
सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस)
सांगली – विशाल पाटील (काँग्रेस)
भिवंडी – दयानंद चोरघे (काँग्रेस)
वर्धा – हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुख (काँग्रेस)
नागपूर – अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, प्रफुल गुडधे (काँग्रेस)
रावेर – एकनाथ खडसे (शरद पवार गट)
दिंडोरी – चिंतामण गावित (शरद पवार गट)
बीड – नरेंद्र काळे (शरद पवार गट)
चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान आणि डॉ. नितीन कोडवते (काँग्रेस)
नांदेड – आशा शिंदे (काँग्रेस)
काँग्रेस धुळे – तुषार शेवाळे आणि शामकांत सनेर (काँग्रेस)
नंदुरबार – के सी पाडवी (काँग्रेस)
Discussion about this post