Pimpri News : पिंपरी : लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील १२२ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे.
गुरुवारी पत्रकार लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांची दखल घेतली जात नाही. विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जातात, असे आरोप राजीनामा देणार्या कार्यकर्त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वीच लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद होगले यांना तडकाफडकी पदावरून हटवून त्यांच्याजागी मंगेश मावकर यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून पक्षांतर्गत नाराजी वाढू लागली होती. त्याची परिणिती आता राजीनामे देण्यात झाली आहे.
यामुळे मावळातील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले आमदार सुनील शेळके यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Discussion about this post