Mumbai News : मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जळजळीत टीका करत बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करणार्या माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर आपली तलवार म्यान केली आहे. आपल्याच पक्षाचे सर्वोच्च नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दाद न देणार्या शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला मान दिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान आज २८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन शिवतारे आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे.
काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह शिवतारे यांची बैठक झाली.या बैठकीत त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. फडणवीस यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशी माहिती बाहेर आली आहे.
Discussion about this post