व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -महापालिकेचे सर्व रुग्णालये, दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा व औषध उपचाराच्या दरवाढीचा प्रस्ताव मागे घ्यावा आणि महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्याची पारदर्शक पद्धतीने खरेदी करून विद्यार्थ्यांना तातडीने वाटप करण्याबाबत विविध सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. मागणीचे सविस्तर निवेदन दिले.
त्यात म्हटले आहे की, शहरात 72 पेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत. गोरगरीब कष्टकरी कामगारांची ही औद्योगिकनगरी आहे. या शहरातील गोरगरीब,कष्टकरी, नागरिक महापालिकेच्या 8 रुग्णालय व 29 दवाखान्यातून उपचार घेतात. हे उपचार या रुग्णांना अल्प दरात मिळतात. या रुग्णांमधील अतिगरीब रुग्णांच्या उपचाराचे आलेले बिलात नगरसेवक, आमदार, खासदार कार्यकर्त्यांच्या शिफारशीवर सवलत देण्यात येते.
वैद्यकीय सुविधांसाठी शासनाने निर्धारित केलेले सुधारित दर हे महापालिका रुग्णालय व दवाखान्या करिता लागू करण्याचा अन्यायकारक निर्णय आहे. हा निर्णय लागू केल्यानंतर सुरू असणाऱ्या प्रचलित दरापेक्षा दुपटीने दरवाढ होणार आहे. देशातील कोविड महामारी, नोटबंदी, बेरोजगारी व प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना गोरगरीब वंचित घटकातील रुग्णांना महापालिका रुग्णालयच आपला जीव वाचवण्यासाठी आधार वाटतात. सन 2017 चा हा शासन निर्णय लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसताना सन 2022 मध्ये लागू करत आहात. हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात असून हा मंजूर केलेला प्रस्ताव विखंडित करावा. निर्णय मागे घ्यावा.
Discussion about this post