New Delhi : नवी दिल्ली : दिल्ली दारूघोटाळा प्रकरणी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचे वजन साडेचार किलोने कमी झाले आहे.डॉक्टरांचे पथक त्यांची तपासणी करत असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
आप नेत्यांच्या म्हणण्यानुसार केजरीवाल यांची प्रकृती पूर्णपणे ठीक नाही. २१ मार्च रोजी अटक झाल्यानंतर तुरुंगातही त्याचे वजन कमी होऊ लागले आहे. तर केजरीवाल यांची प्रकृती ठीक असून कारागृहातील डॉक्टर त्यांची नियमित तपासणी करत आहेत. अशी कोणतीही समस्या नाही. असे तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
केजरीवाल यांना तिहार तुरुंगातील बॅरेक क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या रक्तातील साखर कमी झाली होती. ती नियंत्रित करण्यासाठी त्यांना औषधे देण्यात आली आहेत.
केजरीवाल यांना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी फक्त घरी बनवलेले जेवण दिले जात आहे. त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी त्यांच्या बॅरेकजवळ क्विक रिस्पॉन्स टीमही तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत तुरुंग प्रशासनाकडून सर्व सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Discussion about this post