News Delhi : नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अखेर अटक केली आहे.
दिल्ली मद्यधोरण अंमलबजावणी घोटाळा प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना तब्बल ९ समन्स पाठविली होती. त्याला त्यांनी दाद दिली नाही. केजरीवाल यांच्यावतीने अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी उच्चन्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.
तो फेटाळला गेल्यानंतर ईडीने केजरीवाल यांना ताब्यात घेत दोन तास चौकशी केली. आणि, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
Discussion about this post