व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवरील शास्तीकर माफीचा अध्यादेश राज्य शासनाने शुक्रवारी (दि.3) प्रसिद्ध केला आहे. मूळ मिळकतकराचा भरणा केल्यानंतरच शास्ती माफ होणार आहे.
त्यामुळे मालमत्ताधारकांनी मूळ कर त्वरित भरून शास्ती माफीचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.
अनधिकृत बांधकाम शास्ती माफ म्हणजे ते बांधकाम नियमित झाले असे होणार नाही, हे सुद्धा शासन निर्णयामधून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या 3 मार्चपर्यंत अस्तित्वात असलेल्या अनधिकृत बांधकाम असलेल्या मालमत्तांची नोंद संबंधितांनी केली नसेल तर अशा मालमत्ताारकांच्या बाबतीत काय धोरण असावे याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवले जाणार आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
311 कोटी मूळ मिळकतकर थकीत : अनधिकृत बांधकामांवरची शास्ती माफ झाल्याने आता एकूण 311 कोटी 17 लाख मूळ मिळकतकर थकीत आहे. नागरिकांनी आता स्वतःहून मूळ मिळकतकराचा संपूर्ण भरणा 31 मार्चपर्यंत करून महापालिकेला सहकार्य करावे. यापुढे शहरात कोठेही अनधिकृत बांधकाम होणार नाही यासाठी पालिकेकडून कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. तीन मार्च 2023 नंतर होणार्या बांधकामांना पूर्वीच्याच दराने शास्तीकर लावला जाईल, असे महापालिके आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या नागरिकांनी मिळकतकर भरला नाही अशांची नावे लवकरच वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. करसंकलन विभागाने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे मोहिम तीव्र केली आहे. निवासी व बिगरनिवासी थकबाकीदारांना थकीत मिळकतकर भरून जप्ती टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
नागरिकांच्या सेवेसाठी मूळ मिळकतकराचा भरणा करण्यासाठी विभागीय 17 करसंकलन कार्यालये 31 मार्चपर्यंत साप्ताहिक सुटीच्या दिवशी तसेच, कार्यालयीन वेळेनंतसुद्धा अधिकचा वेळ कार्यालये सुरू ठेवून भरणा स्वीकारण्यात येणार आहे.
Discussion about this post