व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
काही वर्षा मागे टाकाऊ वस्तूं पासून सुशोभीकरणाच्या वस्तू नगरपालिका करत असल्याचे दिसत होते.जुन्या व नवीन पुलाच्या मधोमध तसेच चाकण चौकात ही सुशोभीकरणा च्या त्या वस्तू नागरिकांना पाहिला भेटल्या. परंतु जुन्या दुरवस्थेत असलेल्या स्व. इंदिरा गांधी प्रा.विद्यालयात व त्या समोरील मैदानात टाकाऊ पासून सुशोभीकरण करणाऱ्या वस्तू वीणा, अंतरिक्ष यान इ.वस्तू त्या शाळेच्या मैदानात तश्याच पडून दिसत आहेत.
कचऱ्याच्या गाडी मागील ट्रॉल्या ,मोडकळीस आलेल्या गंजत चाललेल्या कचराकुंड्या,तश्याच दुरवस्थेत असलेल्या कचरा कुंड्या चार नंबर शाळे च्या मैदानावर ही दिसून येतात. नगरपालिकेच्या जवळ असणाऱ्या या जुन्या नगरपालिकेच्या शाळेत अनेक दिवसांपासून
बंद दुरवस्थेत असलेला कालबाह्य झालेला टेम्पो,शाळेच्या खोल्यांमध्ये तुटके दरवाजे,तुटलेल्या अवस्थेत लाकडी वस्तू ,शौचालयाची भांडी,लोखंडी ई. वस्तू ही तिथे दिसत आहे.बाहेर शाळे समोर महाराष्ट्र शासन नियोजन विभाग,तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे मोठे वाहन वापराविना तसेच उभे आहे.
रस्त्याच्या मधोमध असणारे झाड कापले असून त्यातील एक मोठा लाकडी ओंडका बरेच दिवस रस्त्यावर च दिसून येत आहे.नगरपरिषदेची जुनी MH 14 AE 8045 ही चारचाकी गाडी दुरवस्थेत तिथे दिसत आहे. पालिकेच्या या बंद असलेल्या जुन्या शाळेच्या मैदानात व खोल्यांमध्ये गरज नसलेल्या काही वस्तू तश्याच कित्येक दिवस गंजत धूळ खात दुरवस्थेत पडलेल्या दिसून येत आहेत.पालिकेसाठी गरज नसलेल्या त्या काही वस्तू ,काही कालबाह्य वाहन,कचऱ्याच्या ट्रॉल्या,मोडकळीस आलेल्या कचरा कुंड्या इ.वस्तू विनाकारण सांभाळताना दिसत आहे. त्या जुन्या शाळे शेजारी चार नंबर शाळा भरत असते.तेथे विनाकारण गरज नसलेल्या काही वस्तुंची साठवणूक केलेली दिसत आहे. नगरपालिका प्रशासनाने त्या वस्तूबांबत योग्य तो निर्णय घेऊन तेथील मैदान मुलांसाठी खेळण्यासाठी खुले करण्यासाठी उपाय योजना करायला हव्यात.तिथे उपयोगी असणाऱ्या वस्तूंची योग्य ती काळजी घेत योग्य त्या ठिकाणी दरवेळेस वापरण्यात याव्यात.योग्य असा निर्णय घेऊन नगरपालिकेने त्या वस्तू पासून आर्थिक लाभ कसा होईल पालिकेच्या तिजोरीत भर कशी पडेल याकडे लक्ष देणे
गरजेचे आहे.रात्रीच्या वेळेस बंद झालेल्या या शाळेमधील खोल्यांचा मुले दुरूपयोग ही करत असतात तेथील जवळपास च्या काही नागरिकांनी ही माहिती दिली.
Discussion about this post