व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -१मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आकुर्डी मधील कामगारांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दत्तवाडी आकुर्डी येथे राष्ट्रवादीचे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी कष्टकरी कामगारांचा सन्मान सोहळा आयोजित केला या बद्दल त्यांचे अभिनंदन असे गौरवोद्गार अजित गव्हाणे यांनी काढले.
यावेळी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजलभाई शेख,माजी नगरसेवक निलेश पांढरकर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, कामगार सेल चे अध्यख किरण देशमुख,पुष्पा शेळके,कविता खराडे,शकरूला पठाण,साहूल हमीद शेख, अशोक वायकर,मनीषा गटकल, ज्योती गोफने, आशा मराठे, निर्मला माने,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कविता आल्हाट, विनायक रणसुभे, ज्ञानेश्वर ननावरे, आर.जी. जाधव,यशवंत भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत सोनार, गंगाधर चौधरी, विश्वनाथ मोरे,चंद्रकांत इंगळे,आण्णा भोसले,गौतम बेंद्रे,अनिल पाटील, शिवाजी मिसाळ, रमेश भोरकर शाहरुख शेख, सुनील मोरे,भास्कर म्हस्के,जावेद पठाण, जिब्राईल शेख,नम्रता गुरव , ललिता माने, संगीता पारेख यांनी परिश्रम घेतले, प्रास्ताविक इखलास सय्यद यांनी केले आभार झाकीर रमजान शेख यांनी मानले तर सूत्र संचालन प्रकाश परदेशी यांनी केले.
Discussion about this post