व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापालिका सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, महापालिका कर्मचारी वासिम कुरेशी, दीपक पवार, संदीप बहिरट, शीतल पवार, मारुती मारणे, मानसिंग गायकवाड, हेमा शिंदे, अनिल घाडगे, सुरेश मोरे, लक्ष्मन तितकारे, दिलीप गावडे, पत्रकार प्रमोद गरड आदी उपस्थित होते.
Discussion about this post