व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी-खान्देश अहिराणी कस्तुरी मंचच्या अध्यक्षा विजया मानमोडे यांचा आपचे प्रदेश संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते आम आदमी पार्टीत प्रवेश करण्यात आला.
यावेळी सुरेश मानमोडे ,छाया मनोहर भदाने,कल्पना वारडे ,शोभा पारे,तसेच सामाजिक कार्यकर्ते गोपाल कृष्ण (गोपी)पिल्ले महेश नगर, राहुल जाधव आनंदनगर , असा अनेक कार्यकर्त्यांनी आपमध्ये प्रवेश केला, यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विंग वहाब शेख, ब्रह्मानंद जाधव,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये खान्देश भागातील असंख्य जनता वास्तव्यास आहे, विजय मानमोडे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका लक्ष 2022डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केल्याचे बोलले जात आहे त्या वाल्हेकरवाडी प्रभागातून उत्सुक असल्याचं समजते..
त्या महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी राज्यस्तरीय मराठमोळी सौंदर्य प्रतियोगिता
उद्देश – मराठी बोलीभाषा संवर्धन व साहित्य कला संस्कृती प्रचार प्रसार
साहित्यिक व सांस्कृतिक ,सामाजिक क्षेत्रात २० वर्षा पासून कार्यरत आहेत
अहिराणी कस्तुरी मासिक संपादिका आहेत
त्यांना ७०हून अधिक सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र वविविध पुरस्काराने सन्मानीत केले आहे
२०२१ला अहिराणी थेटर चित्रपट निर्मिती कार्य सूरू आहे.
जानेवारी २०२१ ला
नऊवारी शान महाराष्ट्राची या व्हिडीयो अल्बमची निर्माती /गीतकार त्या आहेत
महिलांना उद्योग व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन सोबत त्यांच्या कलागुणांना राज्यस्तरीय व्यासपिठ देण्यासाठी त्या आघाडीवर असतात
बहुभाषिक कवीसंमेलन, राज्यस्तरीय ग्रामीण अहिराणी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय साहित्य संमेलन , खान्देश महोत्सव , सांस्कृतिक महोत्सव , स्नेह संमेलन, १० वी १२ वी चे चांगल्या गुणांनी पास झालेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा गुणग् गौरव सोहळा , उच्च शिक्षण मार्गदर्शन कार्यशाळा, स्री शक्ती कस्तुरी पुरस्कार सन्मान सोहळा, आखिल भारतीय खान्देश कोहिनुर व खान्देश रत्न सन्मान सोहळा, महिलांच्या कलागुण कौशल्याच्या स्पर्धा , एकपात्री नाटकांचे आयोजन असे विविध सामाजिक हिताच्या दृष्टीने विविध उपक्रमासाठी कार्यरत आसतात.
Discussion about this post