व्हीएसआरएस मराठी न्युज – समाजातील दुर्गांची साडी-चोळीने ओटी भरुन साजरा करुया आनंदाचा, सन्मानाचा नवरात्रोत्सव कैलास कुटे
दरवर्षी आपण सर्व महिला वर्ग या नऊ दिवसात ठराविक दिवसा प्रमाणे वेगवेगळ्या नऊ रंगाच्या सुंदर सुंदर साड्या अथवा ड्रेस परिधान करून मोठ्या उत्साहाने नवरात्रोउत्सव साजरा करतोच ना! परंतु यावर्षी आपण स्वतःसोबत एका मातेला … भगिनीला ही सजवू याना! त्यांना आपण आई तुळजा भवानी मातेच्या , आई अंबाबाईच्या, आई सप्तशृंगीच्या, आई वैष्णवीदेवीच्या, आई जोगेश्वरीच्या, आई रेणुकामातेच्या, आई शाकंबरीच्या, आई दुर्गामातेच्या, आई महिषासुरमर्दिनीच्या, आई काळुबाईच्या रुपात पाहून … तिची साडी चोळीने, मानाने, आनंदाने ओटी भरू या . अहो आपल्याला अनेक शुभकार्यात साड्या मिळालेल्या असतात आणि त्या घरात तशाच शिल्लक असतात.
मिळालेली प्रत्येक साडी आपण वापरतोच असे नाही, तर मग चला अशा साड्या आपण अशा काही गरजू माता भगिनींना नवरात्रीनिमीत्त देऊन त्या भवानी आईच्या आशीर्वादरुपी सोन्याने आपली व कुटुंबाची परडी भरुन घेऊया.
“चला तर मग आपण ही या आवाहनाचा स्वीकार करा आणि आपल्या घरातील छान व सुंदर एक साडी ब्लाऊजपीस सहित आमच्यापर्यंत पोहचवा . ती आम्ही देवीच्याच रुपापर्यंत म्हणजेच गरजू महिलांपर्यं पोहचवू . त्यायोगे खऱ्या अर्थाने या देवींना आपण साडी देऊन नवरात्रोत्सव साजरा करूया !”नवरात्रोत्सवाच्या अपणास व आपल्या कुटुंबास हार्दिक शुभेच्छा.
“कृपया जुनी साडी स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी”
आपण प्रेमाने दिलेल्या साड्या या नवदुर्गाना दिल्या जाणार!
१.वृद्धाश्रम महिला
२.कचरा वेचक महिला
३.घरकाम करणाऱ्या महिला
४.जोगवा मागणाऱ्या महिला
५.भिक्षेकरी महिला
६.आदिवासी महिला
७.देवदासी महिला
८.पोतराज महिला
९.तृतीयपंथी महिला
नवमी पर्यंत ही साडी सकाळी ११ ते ५ या वेळेत स्वीकारली जाईल. दसरा निमित्त ऑफिसला सुट्टी राहिल. साडी जमा करावयाचे ठिकाण –
कैलास गणपत कुटे जनसंपर्क कार्यालय
श्री विठ्ठल मंदिर समोर विठ्ठलवाडी आकुर्डी
Discussion about this post