व्हीएसआरएस मराठी न्युज –केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणा-या दुस-या टप्प्यातील ‘अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क 2022’ या उपक्रमाचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी, सहसचिव (स्मार्ट सिटीज मिशन) कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत (ऑनलाईन) उदघाटन कार्यक्रम पार पडला.सर्वेक्षण मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, कार्यकारी अभियंता (वाहतुक विभाग) बापूसाहेब गायकवाड यांच्यासह अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंजच्या पहिल्या टप्प्यात देशातील 130 शहरांनी सहभाग घेतला होता. यापैकी केवळ 46 शहरांची निवड करण्यात आली. या निवडक शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा देखील समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण दरम्यान आढळलेल्या समस्या आता दुसऱ्या टप्प्यात सोडविण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये स्टार्टअप प्रोग्रामचाही समावेश करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर दुरगामी, सकारात्मक परिणाम करणा-या शाश्वत विकासाची प्रक्रिया उत्तम प्रकारे राबविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.
Discussion about this post