व्हीएसआरएस मराठी न्युज –यूथ ऑर्गनायझेशन फॉर ज्वाईनिंग अॅक्शन अॅण्ड नॉलेज (योजक) आणि बजाज ऑटो सीएसआरच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे प्रायोगिक तत्वावर सुरू केले. लर्निंग सेंटरच्या लाईफ कौशल्याशी निगडित टेक्नॉलॉजीशी निगडीत ‘एरोमॉडेलिंग शो’ चे आयोजन पिंपरी येथील एच.ए. मैदानावर करण्यात आले होते.
विमानांचे आकर्षण काय असते, हे गडचिरोली येथे पाहण्यात आले. येथील माडिया जमातील विद्यार्थ्यांना भारत दर्शनासाठी नेले होते. परंतू त्यांना विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये बसणे हे भारत दर्शनापेक्षा अधिक महत्वाचे वाटले. त्यांचा चेहर्यावरील आनंदाने सर्वांचे बालपण जागृत केले आहे. आज ही एरोमॉडेलिंगचे प्रात्यक्षिके पाहतांना बालपण जागृत झाले, असे भावूक उद्गार पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंग यांनी व्यक्त केले आहे.
यूथ ऑर्गनायझेशन फॉर ज्वाईनिंग अॅक्शन अॅण्ड नॉलेज (योजक) आणि बजाज ऑटो सीएसआरच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे प्रायोगिक तत्वावर सुरू केले. लर्निंग सेंटरच्या लाईफ कौशल्याशी निगडित टेक्नॉलॉजीशी निगडीत ‘एरोमॉडेलिंग शो’ चे आयोजन पिंपरी येथील एच.ए. मैदानावर करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विचारांचे नवीन पंख देण्यासाठी आयोजित या शोमध्ये विमान मॉडेल्सच्या उड्डाणाचे रोमांचक प्रात्यक्षिक होते. यावेळी पीसीएमचे ३ हजार विद्यार्थ्यांनी शोचा आनंद लुटला. मनपातर्फे एज्यूकेशनल कार्निवलचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी याचा शेवट एरोमॉडेलिंग शोच्याद्वारे करण्यात येईल. तंत्रशिक्षणाचा ध्यास,करी जीवन विकास हा देण्यात आलेला संदेश विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी खूप मोठा आहे.
Discussion about this post