व्हीएसआरएस मराठी न्युज –महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधात कायदा मंजूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे.
राज्यात लव्ह जिहादची प्रकरणं वाढत असल्याने लव्ह जिहाद विरोधात कायदा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सध्या उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा आहे. लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणं, अशा विवाहाला साह्य करणं हे कायद्यानुसार गुन्हे आहेत. यात दोषी असल्याचं सिद्ध झालं, तर आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. यातली पीडित मुलगी 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल, तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. कोणती संस्था-संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल, तर तीन ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
Discussion about this post