व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना केली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले आहेत.
अधिक माहिती देताना, काकासाहेब डोळे (उपायुक्त परिमंडळ 3) म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी जिल्हा व पोलीस आयुक्तालाय स्तरावर दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालायासाठी विरोधी शाखेची स्थापना केली आहे. एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व 5 अंमलदार यांची नियुक्ती या शाखेसाठी करण्यात आली आहे.’
Discussion about this post