व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी, ता. ९ : वाहतुककोंडीमुळे ग्रासलेल्या पिंपरी चिंचवडकरांना वाहतुक विभागाने काहिसा दिलासा देणारी बाब समोर आणली आहे. नागरिक तसेचवाहनचालक यांना वर्षोनवर्ष
भेडसावणारा वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न वाहतुक विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
यामुळे वाहतुक कोंडीततासन तास अडकुन पडलेल्या चालकांना वेळेतइच्छित स्थळे पोहचता येणार आहे.
या करिता पिंपरी चिंचवड वाहतुक विभागाने गुगल मॅप अँप सुरु केले आहे. या अॅप च्या माध्यमातुन कोंडी झालेल्या ठिकाणची माहिती मिळताच त्याठिकाणी त्वरित संबंधीत वाहतुक विभागास सुचना करून रस्ता मोकळा केला जाणार आहे.
विशेषतः चाकण, भोसरी, हिंजवडी, तळवडे या भागातील नागरिक आणि कामगार यांच्यासाठी हे अॅप एक प्रकारे वरदान ठरणार आहे .
शहरातील वाहतुकीवर सीसीटिव्हिच्या माध्यमातुन नजर ठेवली जात असली तरी ठराविक अंतरावरील चित्रीकरण या कॅमेरांद्वारे केले जाते. परंतु त्यामुळे लांब पल्ल्यावर कोंडीच्या ठिकाणी हे कॅमेरे पोहचत नाहीत. त्यामुळे नेमकी वाहतुक कोंडी कोठे आणि कशामुळे झाली आहे. हे लक्षात येत नाही. कोंडी सोडविण्यात अडचणी निर्माण होतात.
अशा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी या अँप मध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सुचना केल्या होत्या. वरिष्ठ अधिकारी यांच्या सुचना प्रमाणे नियंत्रण कक्षात मोठ्या स्क्रिन बसवुन त्यानुसार सीसीटिव्ही तसेच गुगल मॅप द्वारे निरीक्षण केले जाणार आहे. ज्या ठिकाणी वाहतुक कोंडी झाली आहे. त्या ठिकाणी संबंधीत वाहतुक विभागास वाहतुक नियंत्रण कक्षाद्वारे वायरलेस कॉल करून वाहतुक कोंडी सोडवुन वाहतुक गतीमान करण्यात येणार आहे.
Discussion about this post