व्हीएसआरएस मराठी न्युज –रेणुका शिशुपालन केंद्र चऱ्होली येथे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत कपडे व आवश्यक वस्तू वाटप.
भोसरी विधानसभेचे आमदार कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे व शहराध्यक्ष भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा यांच्यातर्फे आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत आज चवथ्या दिवशी चऱ्होली येथील शिशुपालन केंद्रामध्ये कपडे व आवश्यक वस्तू वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मा. ऋषिकेशभाऊ रासकर (शहराध्यक्ष भाजप ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर) मा.जयश्रीताई देशमाने (भाजप ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर) मा. योगेश अकुलवार (उपाध्यक्ष भाजप ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर) मा. लताताई हिंदळेकर (उपाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा) कुमार रासकर व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मा. ऋषिकेशभाऊ रासकर यांनी आमदार महेशदादा लांडगे यांच्यामार्फत शिशुपालन केंद्रासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.
Discussion about this post