व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा यांनी सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आपल्या आरोग्याची जपणूक करुन आनंदाने जगावे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे जुलै २०२२ अखेर सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
जुलै २०२२ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, कार्यालय अधिक्षक लक्ष्मण काळे, प्रभाकर शेलूकर, कनिष्ठ अभियंता उल्हास भालेराव, उपशिक्षिका कल्पना गोलहार, नयना घोलप, वाहनचालक रामदास गव्हाणे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हंसराज साळवे, मनोरंजन वागतकर, इले. मोटार पंप ऑपरेटर प्रकाश जाधव, मजूर मधुकर जाधव, रखवालदार किशोरीलाल यादव यांचा समावेश आहे.
Discussion about this post