Pimpri News : पिंपरी : रावेत येथील एस. बी. पाटील रोड, आदित्य विवाज हाउसिंग सोसायटी समोर तीन दुकाने १७ एप्रिल रोजी पहाटे लागलेल्या आगीत भस्मसात झाली.
या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच प्राधिकरण, थेरगाव आणि पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्रातील आगीचे बंब तेथे पोहोचले. त्यांनी आग विझविली.
एस. बी. पाटील रोडवरील साईसावली फ्रेश मार्ट या दुकानाला प्रथम आग लागली. ही आग बाजूच्या दोन दुकानात पसरली. आगीची माहिती साईसावली मार्टचे मालक अंकुश व्यंकटराव माने यांनी अग्निशमनदलाला दिली. या आगीत विश्वनाथ पांडुरंग शेवाळे यांचे हॉटेल सुरेखा, श्रावण निवृत्ती संगमे यांचे ओमसाई ऑटो गॅरेज दोन्ही व्यवसायही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
Discussion about this post