Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील भोसरी पोलीसठाण्याच्या पथकाने खून, मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या ९ एप्रिल रोजी मुसक्या आवळल्या असून १ पिस्तूल, ०२ मॅक्झीन व ०२ जिवंत राऊंड जप्त केले आहेत.
अमोल फिलीप साळवे, वय – ३० वर्षे, रा. गव्हाणे पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, विठ्ठल दर्शन सोसायटी, फ्लॅट नंबर १९, आळंदी रोड, भोसरी, पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस दाखलेबाज गुन्हेगारांचा कसोशीने शोध घेत आहेत. भोसरी पोलीसठाण्याचे पथक ही कामगिरी करत असताना एकजण भोसरीतील वाळके यांचे गोठ्याकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यावर पिस्तूल घेऊन फिरत आहे; अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीसपथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता १ पिस्तूल, ०२ मॅक्झीन व ०२ जिवंत राऊंड असा सुमारे ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला.
आरोपीला भोसरी पोलीसठाण्यात आणून त्याच्यावर २४७/२०२४ क्रमांकाने भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोहारे, सहायक फौजदार राकेश बोयने, हवालदार हेमंत खरात, प्रतिभा मुळे, अंमलदार नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, तुषार वराडे, ज्ञानेश्वर साळवे, नुतन कोंडे यांनी केली.
Discussion about this post