Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था या संस्थेचा ६ वा वर्धापनदिन रविवार दिनांक ०७ एप्रिल २०२४ रोजी दत्तकृपा सांस्कृतिक हॉल संभाजीनगर चिंचवड येथे साजरा करण्यात आला. ही संस्था मागील सहा वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, साहित्य अशा अनेक प्रकारच्या विभागात सातत्याने काम करत आहे. युवाशक्ती संस्थेमध्ये कोकणस्थ पिंपरी चिंचवड स्थायिक युवकांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
यावर्षीही संस्थेच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त “समाजाची गरज आणि सामाजिक बांधिलकी” जपत चिंचवड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास शंभरहून अधिक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात कामगार नेते कैलास कदम. (शहराध्यक्ष काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाला नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक सुरेश म्हेत्रे, युवानेते यश साने, रुपेश कदम. (युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य), गजानन मोरे. (युवक अध्यक्ष कोकण विकास महासंघ), अशोक कदम. (अध्यक्ष अठरागाव रहिवासी विकास सेवा संस्था), राम उत्तेकर. (अध्यक्ष पंधरागाव कोकण विकास सेवा ट्रस्ट), आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री रुपेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व युवाशक्तीच्या सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा वर्धापनदिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप कदम यांनी केले. आणि अध्यक्ष रुपेश मोरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Discussion about this post