Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक आणि समाजसेवक मारुती भापकर म्हणजे पालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या डोकेदुखीचा विषय आहे. कुठे काही भ्रष्टाचार घडलाम गैरव्यवहार झाला की भापकर पेटून ऊठतात. आंदोलने उभारतात. अलिकडे पोलिसांनी भापकरांच्या बाबतीत नवा फ़ंडा काढलाय!. भापकर आंदोलन करणार असा अंदाज पोलिसांना आला की पोलीस त्यांच्या घरी येतात आणि त्यांना एखाद्या पोलीसठाण्यात दिवसभर नजरकैदेत ठेवतात. आणि, मग सोडून देतात.
शहरातील भक्तीशक्ती शिल्पाजवळ असलेला भूखंड शिवजयंती, अण्णाभाऊ साठे जयंती आणि इतर कार्यक्रमासाठी राखीव ठेवावा अशी येथील नागरिकांची मागणी असताना पीएमआरडीएने तो एका बिल्डरला विकून टाकला. याबद्दल नागरिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस, अजित पवार यांच्याकडे दाद मागितली या सर्वांनी मागणीशी सहमती दर्शवत भूखंडाबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र बिल्डरने उच्च न्यायालयात दाद मागितली त्याच्या बाजूने याचिकेचा निकाल लागला. आज १० एप्रिल रोजी पीएमआरडीए आणि बिल्डरचे प्रतिनिधी या जागेचा ताबा पोलीस बंदोबस्तात ताबा घेणार आहेत. ही माहिती कळताच नागरिकांनी तेथे सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची तयारी केली.
मात्र, तत्पूर्वीच आज १० एप्रिल रोजी सकाळी पोलीसांची गाडी भापकर यांच्या घरी आली. आणि त्यांचा सरकारी पाहुणचार करण्यासाठी घेऊन गेली. प्रश्न हा आहे की, जनतेच्या प्रश्नावर
भांडणारा भापकर यांच्यासारखा एकच कार्यकर्ता या शहरात का? मोठ्यासंख्येने असे कार्यकर्ते का निर्माण होत नाहीत.
Discussion about this post