Pimpri News : पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या १८ एप्रिल उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे सोमवारी तर आघाडीचे संजोग वाघेरे मंगळवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.
सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आहे. मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक कार्यालय ७ वा मजला, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी येथे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
२५ एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. २६ रोजी अर्जांची छाननी होईल. २९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १३ मे रोजी मतदान आणि ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
Discussion about this post