Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे २० मार्च रोजी सायंकाळी मोबाईल चोरल्याच्या संशयावरून दोघांनी एका व्यक्तीला बांबू आणि फळीने बेदम मारहाण केली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
महादेव विठ्ठल शिंदे (वय 45, रा. मोरे पाटील चाळ, चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या खुनाच्या आरोपावरून चिखली पोलिसांनी राजू अनिल गांगुली (वय 28), विनोद शांताराम पवार (वय 22, दोघे रा. कुदळवाडी, चिखली) यांना अटक केली आहे.पोलीस उपनिरीक्षक विजय पंचमुख यांनी या प्रकरणात सरकारतर्फे तक्रार दिली आहे.
राजू गांगुली याच्या ओळखीच्या महिलेचा मोबाईल मृत महादेव शिंदे याने चोरल्याचा संशय त्या महिलेला होता. ती चिखलीतील चौधरी वजनकाट्यानजिक महादेव याला गाठून त्याच्याकडे चौकशी करत होती. त्यावेळी दोन्ही आरोपी तिथे आले. त्यांनी मृताला बेदम मारहाण केली. बांबू आणि फळीने त्याच्या डोक्यात प्रहार केले यामुळे महादेव शिंदे याचा मृत्यू झाला.
Discussion about this post