Pimpri News : पिंपरी : म्हातोबानगर, वाकड येथे रस्त्याच्या बाजूस उघडपणे गांजाची विक्री सुरू असल्याचा प्रकार योगायोगाने उघडकीस आला असून पोलिसांनी या प्रकरणी चार महिलांना अटक करून त्यांच्याकडून १ किलो ४३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याची बाजारात किंमत १ लाख १ हजार इतकी आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई मितेश यादव यांनी वाकड पोलीसठाण्यात तक्रार नोंदविली असून त्यावरून मोनिका राजेंद्र वाडघरे, हर्षदा कृष्णा राऊत, गिता मुकेश यादव, माला अनिल गुंजाळ (सर्व रा. कृष्णा स्वीट होमसमोर, म्हातोबानगर, वाकड) आणि गिता मलकेकर, रेखा तामचीकर (रा. भाटनगर, पिंपरी) या महिलांना अटक केली आहे. त्यांच्यावर १६२/२४ क्रमांकाने एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी पोलिसांचे अमलीपदार्थ विरोधी पथक गस्त घालत म्हातोबानगर येथे कृष्णा स्वीट होम नजिक आले असता तेथे बसलेल्या चार स्त्रिया अचानक निघून जाऊ लागल्या. संशय आल्याने पोलिसांनी त्यांना थांबविले. त्यांच्याकडील पिशवीची झडती घेतल्यावर त्यात गांजा आढळून आला.त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गांजा भाटनगर,पिंपरी येथील गिता मलकेकर व रेखा तामचीकर यांच्याकडून
आणल्याचे सांगितले.
Discussion about this post