Pune News : पुणे : एका व्यक्तीने उसने घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून त्याच्या अल्पवयीन मुलीला १० ते १५ दिवस लॉजवर डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केला. आणि, तिला जबरदस्तीने देहविक्रय करण्यास भाग पाडले. हा धक्कादायक प्रकार ऑक्टोबर 2023 ते 14 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पुण्यातील के. के. मार्केट, धनकवडी परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये घड्ला.
या प्रकरणी त्या पीडित मुलीने भारती विद्यापीठ पोलीसठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर एक जोडप्यावर पोक्सो व पिटा कायद्यांखाली गुन्हा दाखल झाला असून त्यातील पुरूष पसार झाला आहे. पोलिसांनी स्त्रीला अटक केली आहे.
पूनम आकाश माने (वय-22) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तर आकाश सुरेश माने (वय-24 रा.शंकर मंदिराजवळ, कात्रज गावठाण, पुणे) हा फरार झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रार देणार्या मुलीच्या वडिलांनी आरोपींकडून आजारपणात उपचार करण्यासाठी ३० हजार रुपये घेतले होते. ते त्यांना परत करता आले नाहीत. त्यामुळे आरोपींनी तिला जबरदस्तीने पळवून नेऊन के.के. मार्केट परिसरात लॉजमध्ये डांबून ठेवले आरोपी आकाश याने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. आणि, ग्राहकांकडून पैसे घेऊन तिला देहविक्रय करणे भाग पाडले.
Discussion about this post