Pimpri News : भोसरी : भोसरीतील लांडेवाडी येथे असलेल्या राजमाता जिजाऊ शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयातील विद्यार्थी अनुज गावडे याची खेलो इंडिया यूथ गेम्स २०२४ मधील कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
त्याने गेल्यावर्षी राज्याच्या संघातून खेळून राज्याच्या संघाला कांस्यपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. अनुज हा महाविद्यालयात १२ वी कला या वर्गात शिकत आहे.त्याला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार विलास लांडे, खजिनदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त व माजी नगरसेवक विक्रांत लांडे, प्राचार्य डॉ. के.जी. कानडे, उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापकव शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.
Discussion about this post