Pimpri News : पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी यांनी आज आपला अर्ज दाखल केला.
त्यांनी मागील वर्षभरापासून ही निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातर्फे त्या मावळमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या. मात्र ही जागा ठाकरे गटाला मिळाली. संजोग वाघेरे यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे शांत बसणे किंवा अन्य पक्षात प्रवेश करणे हे पर्याय त्यांच्यासमोर होते. या पैकी त्यांनी दुसरा पर्याय निवडला.
त्या मूळच्या माणगाव येथील असून त्यांची पनवेल येथेही मालमत्ता आहे.शेती, व्यवसाय असे दोन्ही त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. त्यांचे पतीही कृषक आणि उद्योजक आहेत.
Discussion about this post