Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरानजिक मोईगावामध्ये ४ एप्रिल रोजी अमलीपदार्थ विकीसाठी आलेल्या दोघांना अंमलीपदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून ज्याच्याकडून त्यांनी हा अमलीपदार्थ आणला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इस्तियाक अब्बास चौधरी (वय २६ रा.काळेवाडी), अब्दुलकरीम अब्दुल्ला चौधरी (वय २६ रा. चिखली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून सोमनाथ चौधरी (रा. कुदळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मोईगावातील भैरवनाथनगर परिसरात मेफेड्रोन हा अमलीपदार्थ विकण्यासाठी आले होते.याचा सुगावा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाला लागला. पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याक्डे १६ ग्रॅम मेफेड्रोन आढळले. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी हा अमलीपदार्थ सोमनाथ चौधरी याच्याकडून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. या दोघांसह चौधरीवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post