Pune News : पुणे : दिवंगत खातनाम शास्त्रीय व उपशास्त्रीय गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सौभाग्यवती विद्या अभिषेकी यांचे पुणे येथे निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात मुलगा शौनक अभिषेकी, मुलगी मेखला, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
विद्या अभिषेकी यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण लंडन येथून घेतले होते. अभिषेकीबुवांशी १९६९ साली विवाह झाल्यानंतर त्यांच्या गुरुकुलाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.
Discussion about this post