Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चौघांना पोलीस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले आहे. एक अधिकारी आणि चार अंमलदार यांचा यात समावेश आहे.
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरख ज्ञानोबा कुंभार, हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडू बबन मारणे, पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार चंद्रधर किसन कोंडे, गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार सचिन नामदेव चव्हाण, चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हनुमंत जयराम कांबळे अशी गौरविण्यात आलेल्यांची नावे आहेत.
महाराष्ट्रदिनी पोलीसआयुक्त विनय कुमार चौबे यांनी अपर आयुक्त वसंत परदेशी यांच्या उपस्थितीत या सर्वांचे अभिनंदन करीत त्यांना ही पदके प्रदान केली.
Discussion about this post