व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरात पदयात्रा काढण्यात आली.
पुनर्वापरात न येणा-या तसेच पर्यावरणास हानिकारक ठरणा-या प्लास्टिकचा वापर टाळण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्याकरीता महापालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिकमुक्त शहर या विशेष मोहिमेला प्रारंभ झाला.
शासनाने बंदी घातलेल्या तसेच एकवेळ वापरासाठी असलेल्या प्लास्टिक पिशवी बंदीबाबत शहरात विविध माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. कापडी पिशवीचा वापर करत असल्याचा सेल्फी काढण्याचा उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे.
यामध्ये दि.26,पासून 27, 28, 29 मे 2022 रोजी अनुक्रमे अ आणि ब, क आणि ड, ई आणि फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटना, नागरिक यांच्या सहभागातून प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच 4 जून रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत ‘रिव्हर प्लॉगेथॉन’ मोहिम राबविण्यात येणार आहे.
Discussion about this post