व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी-ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे शनिवारी (दि. 12 फेब्रु) पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. बजाज यांचे पार्थिव आज आकुर्डीतील बजाज कंपनीतील निवासस्थानी आणण्यात आले असून दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.
युवासेना प्रमुख पर्यावरण व पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांनी आज उद्योगपती राहूल बजाज यांच्या पार्थिवाचे दर्शन आकुर्डी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतले.सोबत शिवसेना सचिव श्री.मिलिंद नार्वेकर,संपर्कप्रमुख श्री.सचिन अहीर,खासदार श्रीरंग आप्पा बारणे,नगरसेवक प्रमोद कुटे व अंत्यदर्शनासाठी कंपनीतील कामगार वर्ग तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायाला मिळाली.
संध्याकाळी 4 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
Discussion about this post