व्हीएसआरएस मराठी न्युज -आगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुका आहेत, याच पार्श्वभूमीवर मोदींच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष आहे. या दौऱ्यासंबंधीची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. वनाज ते गरवारे कॉलेज हा पुणे मेट्रोचा पहिला मार्ग असेल जो सुरु होणार आहे.
दरम्यान मार्चमध्ये पुणे महापालिकेचा कार्यकाळ संपणार आहे. प्रभाग रचना या अगोदर जाहीर करण्यात आल्या आहेत. आणि त्यावर हरकती घेणं सध्या सुरु आहे. पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. २०१७ साली ९९ नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. परंतु आता राष्ट्रवादीने ठामपणे दावा केला आहे की यंदाच्या निवडणुकीत आमचाच महापौर होईल त्यामुळे पंतप्रधानांचा या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Discussion about this post