व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी चिंचवड आळंदी:आळंदी येथील देहूफाटा पुणे-आळंदी (ता.हवेली) रस्त्यावर दुतर्फा लॉजिंग व्यवसायामुळे देहविक्री करणाऱ्या
महिलांसह पुरुष लाभार्थ्यांची वर्दळ वाढल्याने याचा त्रास स्थानिक महिला व शालेय विद्यार्थीना होत होता.वेश्या व्यवसायाशी संबंधित अनोळखी महिला-पुरुष थेट येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना विचारणा करून त्रास देत असल्याची घटना
दिसून येत होत्या. १० मार्च २०१९ रोजी देहूफाटा या परिसरात स्थानिक महिलांनाच छेडछाड झाल्याने स्थानिक नागरिकांनी टवाळखोरांसह वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना चोप दिला होता.त्यावेळेस स्थानिक नागरिकांची संतापाची लाट उसळली होती.
त्यावेळेस चे मा.आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन महिलांचे प्रश्न जाणून घेऊन पोलिसांना करवाई च्या सूचना दिल्या होत्या.त्यावेळेसचे पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी महिला व स्थानिक नागरिकांशी संवाद साधून महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या होत्या.लॉजिंग बाबत अधिक दक्षता घेतली जाईल असे सांगण्यात आले होते.
परंतु या घटनेला सव्वा तीन वर्ष झाले असून तरी सुद्धा आळंदी(ता. हवेली) देहूफाट्या रस्त्यावरील देहविक्री करणाऱ्या महिलांमुळे होणाऱ्या त्रासापासून येथील स्थानिक नागरिकांचा त्रास काही कमी झालेला दिसून येत नाही.स्थानिक महिलांना ही या त्रासामुळे घरा बाहेर पडता येत नाही.१७ मे २०२२ रोजी आळंदी देहूफाटा (ता. हवेली) येथे वाढलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला स्थानिक भगिनीने जाब विचारल्यावर तिनेच स्थानिक भगिनीला धमकीची भाषा वापरल्या चा प्रकार
येथे घडला.देहविक्री करणाऱ्या महिलेने स्थानिक महिलेस कापून टाकीन ही भाषा वापरली.त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरलेली दिसली.यावेळेस काहीवेळ रस्ता रोको करण्यात आले.त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली दिसली.त्या ठिकाणी आळंदी पोलीस स्टेशनचे साबळे साहेब व त्यानंतर दिघी पोलीस स्टेशनचे शिंदे साहेब घटनास्थळी पोहोचले. देहविक्री करणाऱ्या वेश्या महिलां पासून होणारे त्रास, वारंवार घडत असलेल्या घटना याबद्दल माहिती देत त्यावर तत्काळ कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे केली. शिंदे साहेबांनी आंदोलन कर्त्यांशी सुसंवाद साधत तेथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.पुढील काळात एक ही वेश्याव्यवसाय करणारी महिला रस्त्यावर आढळणार नाही अशी हमी दिली.कायदा सुव्यवस्था यावर विश्वास ठेवत तेथील रास्ता रोको आंदोलन तूर्तास थांबले.
Discussion about this post