व्हीएसआरएस मराठी न्युज -निगडी :- येथील इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या पुणे पंढरपूर पुणे सायकल वारीचे शनिवारी 18 जून रोजी देहू येथील गाथा मंदिर येथून प्रस्थान होणार आहे. यंदाचे वर्ष सदर सायकल वारीचे सहाव्या वर्षापासून यावर्षी तब्बल अकराशे हून अधिक सायकल भक्तांचा सहभाग यामध्ये नोंदवण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात होईल. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर मध्ये मे महिन्यामध्ये सदर वारीसाठी नाव नोंदणी सुरु करण्यात आली होती. फक्त पंधरा दिवसांमध्ये 1000 हून अधिक लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.
एक दिवसात देहू ते पंढरपूर असे दोनशे पन्नास किलोमीटर अंतर 18 जून रोजी निघेल तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर ते आळंदी अशी परतीची वारी करणार आहेत . सायकल वारी मार्ग- देहू – निगडी – नाशिक फाटा – हडपसर – उरुळी कांचन – भिगवन – इंदापूर – टेंभुर्णी – पंढरपूर आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास संपन्न होईल असे आय ए एस सायकल वारी चे प्रमुख गिरीराज उमरीकर यांच्या तर्फे सांगण्यात आले.
Discussion about this post