व्हीएसआरएस मराठी न्युज –खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सौ. रजनीदेवी पाटील यांचा 26 जुलै 1948 रोजी जन्म झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटूंबातील आहे. 13 मे 1968 साली कराड येथे सातारा जिल्ह्यातील व तालुक्यातील चिंचणेर वंदन हे मूळ गाव असलेल्या बर्गे या सैनिकी परंपरा असलेल्या कुटुंबातील लाडकी कन्या रजनीदेवी यांचा खा. श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे
Discussion about this post