व्हीएसआरएस मराठी न्युज –कर्नाटकच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या आशा असून त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरूल केली आहे.
कर्नाटकात जर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. बेळगावमध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकसाठी केलेली सर्वात मोठी घोषणा म्हणजे दोन वर्षांसाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3,000 रुपये देण्याची. ते म्हणाले की, “बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काहीही करत नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1,500 रुपये प्रति महिना देणार आहे.”
राहुल गांधींनी कर्नाटकात 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणाही केली आहे.
Discussion about this post