व्हीएसआरएस मराठी न्युज -‘आयएनएस विक्रांत’ च्या नावाखाली देशभरातील नागरीकांना भावनीक आवाहन करुन जमा केलेल्या निधीचा हिशोब भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राला द्यावा.
ईडीला किंवा केंद्रीय तपास यंत्राणांना भ्रष्टाचाराचा तपासच करायचा असेल तर त्यांनी प्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील मागील पाच वर्षांचा भ्रष्टाचाराचा तपास करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी केली.
पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख अॅड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेने किरीट सोमय्या यांच्या विरोधात पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन केले.
लोकशाहीचा गळा घोटून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असणा-या केंद्र सरकारपुढे शिवसेना आणि महाराष्ट्रातील जनता झुकणार नाही. वेळप्रसंगी जशास तसे उत्तर देऊ. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या मागे सर्व शिवसेना आणि राज्यातील जनता खंबीरपणे उभी आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी केलेल्या फसवेगिरी विरुद्ध कडक कारवाई करावी अशीही मागणी अॅड. सचिन भोसले यांनी केली.
Discussion about this post