व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळेच डीजे न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होळी आणि रंगपंचमी / धुळवड साजरी करत असताना मद्यपान करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. रंगपंचमी किंवा धुळवड साजरी करत असताना अनेक ठिकाणी खासकरुन शहरी भागात रंगांच्या पाण्याने भरलेले फुगे किंवा पिशव्या मारल्या जातात. मात्र, असे करत असताना अनेकदा दुर्घटनाही घडल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळेच यंदा धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याने भरलेले फुगे मारू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
रात्री 10 वाजण्याच्या आत होळी करावी 10 वाजण्याच्या आधी होळी लावणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतर परवानगी नसणार होळी साजरी करताना डीजे लावण्यास बंदी असणार होळी साजरी करताना डीजे लावल्यास कायेदशीर कारवाई होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे लाऊड स्पीकर जोरजोरात न लावण्याच्या सूचना धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याने भरलेले फुगे मारू नयेत. कुठल्याही जाती किंवा धर्माच भावना दुखावल्या जातील अशा घोषणा देऊ नये.
Discussion about this post