व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -नियमबाह्यपणे मिळकतींची हस्तांतरण नोंदणी करून महापालिकेची कोट्यवधींचे नुकसान करणार्या करसंकलन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी (दि.15) दिली.
दोषी अधिकारी व कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्याचे आदेश संबंधित क्षेत्रीय अधिकार्यांनी दिले आहेत. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्याबाबत आयुक्त म्हणाले, की याप्रकरणी तक्रार माझ्याकडे आली आहे. त्याबाबत तपासणी सुरू आहे. दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. लवकरच त्याबाबत तुम्हाला समजेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Discussion about this post