व्हीएसआरएस मराठी न्युज -आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०ः३० वा.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा कुदळवाडी क्र.८९ येथे सन्मा.अतिरिक्त आयुक्त श्री.प्रदीप जांभळे पाटील व सन्मा.उपायुक्त श्री.संदीप खोत साहेब यांच्या शुभहस्ते शाळेतील बोलक्या भिंती व विद्यार्थी ओळखपत्र वितरण समारंभ संपन्न झाला.
सन्मा.अतिरिक्त आयुक्त श्री.प्रदीप जांभळे पाटील यांनी उद्घाटनाच्या वेळी शाळेच्या इमारत बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे,शालेय शिस्त,व्यवस्थापन व नियोजन यांचे कौतुक केले.तसेच शाळेतील शिक्षक उत्कृष्टपणे काम करीत असल्याचे गौरवोद्गार काढले.शिक्षकांनी उत्कृष्टपणे अध्यापन केल्यामुळे शाळेचा दर्जा चांगला असल्याचे शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेतील यशावरून जाणवते.शाळेच्या यशाची परंपरा अशीच अखंडपणे सुरू ठेवावी असे सांगितले.
शाळेतील रिक्त पदे समायोजनातून व मानधन नेमणूकीतून भरली जातील.शाळेच्या खेळाच्या मैदानासाठी लवकरच जागा उपलब्ध करून दिली जाईल परंतु गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
सदर कार्यक्रमास श्री.दिनेश यादव (स्वी. नगरसदस्य,श्री.कुंदन गायकवाड (फ प्रभाग अध्यक्ष),मा.श्री.संभाजीराव बालघरे,श्री.विशाल बालघरे,श्री.आनंदराव यादव,श्री.तात्यासाहेब सपकाळ,श्री.संतोष मोरे (स्वी. नगरसदस्स्य),श्री.अंकुश मळेकर,श्रीम.दिलशादबी शिकलगार,ऋषी माने,सौ.रेखा हजारे(अध्यक्षा-शाळा व्यवस्थापन समिती) व इतर सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन प्र.मुख्याध्यापक श्री.संपत पोटघन व सर्व शिक्षकांनी केले.सूत्रसंचालन श्री.विठ्ठल बगाटे व आभार प्रदर्शन श्री.खामकर मारूती यांनी केले.
Discussion about this post