व्हीएसआरएस मराठी न्युज -केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी अशी माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “२०२३चे संसदेचे मान्सून सत्र २० जुलैपासून सुरु होईल आणि ते ११ ऑगस्टपर्यंत चालेल. २३ दिवस चालणाऱ्या या सत्रात एकूण १७ बैठका होतील. त्यासाठी मी सर्व राजकीय पक्षांना संसदेच्या कायदेविषयक आणि अन्य कामकाजामध्ये सहभागी होण्याची विनंती करतो. “
२० जुलैपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे, हे सत्र नुकतेच उद्घाटन झालेल्यान नवीन संसद भवनात होणारे हे पहिलेच अधिवेशन ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं नुकतंच उद्धाटन झालं होतं. दिल्लीतील या नव्या संसद भवनात प्रत्येक मंत्र्यासाठी स्वतंत्र कार्यालय असणार आहे. याशिवाय प्रत्येक पक्षाला देखील वेगळं कार्यालय दिलं जाणार आहे.
Discussion about this post