व्हीएसआरएस मराठी न्युज -अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे प्रथम अधिवेशन (शनिवारी) पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले.
मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक, जेष्ठ पत्रकार मधु जोशी होते. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे राज्य संघटक, जेष्ठ पत्रकार गोविंद घोळवे, महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे, जेष्ठ पत्रकार दीपक मुनोत, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते, पत्रकार संघाचे सल्लागार यशवंत भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) वाहतूक आघाडीचे अजीज शेख, महाराष्ट्र कामगार सेनेचे केशव क्षीरसागर, अण्णासाहेब मगर बँकेचे अध्यक्ष प्रा.राजेश सस्ते, संजय सोळंकी, रजणीत कलाटे, पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव व्यासपीठावर होते. जेष्ठ पत्रकार विनायक चक्रे, माधव सहस्त्रबुद्धे, मदन जोशी आणि छायाचित्रकार नरेश नातू, यशवंत नामदे, अतुल मारवाडी यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, सकाळच्या सत्रात वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्राचे प्रदर्शन झाले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही अधिवेशनाला भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक बापूसाहेब गोरे यांनी केले. रेडिओ जॉकी आर जे बंड्या यांनी सूत्रसंचालन केले. तर, सुनील कांबळे यांनी आभार मानले. तर, पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतलाल यादव, कार्यकारिणी सदस्य सायली कुलकर्णी, सरचिटणीस सुनील कांबळे, उपाध्यक्ष महेश मंगवडे, संजय बोरा, कोषाध्यक्ष जितेंद्र गवळी, चिटणीस श्रद्धा कातवडेकर, जिल्हा प्रतिनिधी कलिंदर शेख, गणेश शिंदे, कार्यकारणी सदस्य संतोष जराड, प्रितम शहा, सदानंद रानडे, मुकुंद कदम, अमोल डंबाळे, विश्वास शिंदे, विनय लोंढे, अलताफ शेख, युनूस खतीब, सुहास आढावा यांनी संयोजनात पुढाकार घेतला.
Discussion about this post