व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुण्यातील बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी दुपारी 12 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेतला जातोय. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व विभागांची बैठक घेतली आहे.
यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार 2022 वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडणार आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आहे.
दत्तमंदिराच्या 125 वर्षांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या लक्ष्मीदत्त या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशीही माहिती कदम जहागिरदार यांनी यावेळी दिली आहे.
Discussion about this post