व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -करोना महामारीमुळे दोन वर्ष पालखी सोहळा अत्यंत साध्या पध्दतीने साजरा झाला. आता करोनाची तिसरी लाट कमालीची ओसरली असल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचे 20 जून रोजी तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळ्याचे 21 जून रोजी प्रस्थान होणार आहे. यंदा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दोन्ही पालख्या शहारातूनच पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. या पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना महापालिकेच्या वतीने दरवर्षी भेटवस्तू देण्यात येत असते. करोनाचा काळ वगळता महापालिकेने एक-दोन वर्षांपासून भेट वस्तू देण्याचे बंद करण्यात आले आहे. यापूर्वी भेट वस्तुंमध्ये भ्रष्टाचार झाल्यावरून मोठे वादळ उठले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा जातो. महापालिकेच्या वतीने दोन्ही पालखीतील दिंडी प्रमुखांना गेल्या अनेक वर्षांपासून भेट वस्तू देण्याची प्रथा होती.
मात्र, प्रशासकीय राजवटीत दिंडी प्रमुखांनाभेटवस्तू देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका भेट वस्तू देणार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.
Discussion about this post